जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अ-हेरनवरगाव येथे बालमेळावा,हळदी कुंकू व महिलांच्या विविध स्पर्धा संपन्न.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अ-हेरनवरगाव येथे बालमेळावा,हळदी कुंकू व महिलांच्या विविध स्पर्धा संपन्न.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रह्मपुरी : दिनांक,२४/०१/२४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अ-हेरनवरगाव चे मुख्याध्यापक देवानंद तुर्काने शाळा आणि विद्यार्थी  प्रगतीशील करण्यासाठी ते उपक्रमशील प्रयोग सातत्याने शाळेत राबवीत असतात.विद्यार्थ्यांना स्व कौशल्याने पदार्थ तयार करता यावेत म्हणून त्यांनी शाळेत  बालमेळाव्या अंतर्गत खरी कमाई हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला.शाळेच्या विकासासाठी पालकांचा हातभार या उदात्त हेतूने गावातील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन महिलांच्या विविध स्पर्धा शाळेत घेतल्या.

शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी बाल मेळाव्यात सहभाग घेऊन तयार केलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवले. पालकांनी ते विकत घेऊन त्यांचा मनसोक्त आस्वाद घेतला आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवला. बाल मेळाव्यामुळे दैनंदिन व्यवहारात खरेदी विक्री, नफा तोटा, जमा खर्च व व्यवहार ज्ञानाची ओळख करून भावी उद्योजक निर्माण होण्यास भर पडेल व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल हा मुख्य उद्देश होता.


बाल मेळाव्यानंतर दुपारी 2-00 वाजता गावातील महिला करिता हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला.यात संगीत खुर्ची, सौंदर्य स्पर्धा,ताटी वाटी,एक मिनिट शो, आदर्श पालक माता तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या.महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेण्यात आले.


स्पर्धेत सहभागी विजेत्या महिलांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.दामिनी चौधरी सरपंच प्रमुख अतिथी रतिराम चौधरी सचिव ग्रामपंचायत अ-हेरनवरगाव, मुख्याध्यापक देवानंद तुर्काने, पुनम ठेंगरे,अमरदीप लोखंडे, खरकाटे सर,मंगेश पाथोडे सर , सुरज मून सर, यांच्या हस्ते बक्षिस देण्यात येऊन विजेत्यांचा  सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु.निता गजघाटे मॅडम,कु.रविना रमेश कुथे स्वयंसेविका,कु.वैष्णवी नागरे स्वयंसेवीका तसेच बहुसंख्य पालक व महिला पालक यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कु. प्रियंका निकुरे मॅडम यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !