कळमना येथील ग्राम सम्मेलन व खंजेरी भजन स्पर्धेचा थाटात समारोप.

कळमना येथील ग्राम सम्मेलन व खंजेरी भजन स्पर्धेचा थाटात समारोप. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यस्मरण सोहळा निमित्त कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात संध्याकाळी ७ वाजता समारोपिय कार्यक्रम थाटात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक जि. प. चे सेवानिवृत्त मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीधरराव मालेकर,अध्यक्ष प्राचार्य दौलतराव भोंगळे, प्रमुख मार्गदर्शक राजगड चे आदर्श सरपंच चंदु पाटील मारकवार,विशेष अतिथी जि. प.चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे

माजी सभापती सुनील उरकुडे,कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच,ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव,अ.भा.सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, ग्रामगीताचार्य मारोती सातपुते, आदिवासी नेते बापुराव जी मडावी,सत्कार मुर्ती आदर्श शेतकरी श्रीकृष्ण निखाडे होते. 

          

या प्रसंगी चंदु पाटील मारकवार यांनी सांगितले की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता ही मानवी जीवनाची यशोगाथा आहे. ग्रामगीता प्रत्येक माणसांनी आपल्या जीवनात आचरणात आणली पाहिजे. त्यामुळे मानवी जीवनाचा उत्कर्ष होईल वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्ररणेतुन नंदकिशोर वाढई यांच्या सारखे आदर्श सरपंच घडले.


 हे उत्तम उदाहरण आहे असे विचार व्यक्त केले. विशेष अतिथी म्हणून देवराव भोंगळे यांनी नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून अत्यंत सुंदर असे ग्राम सम्मेलन व भव्य खंजेरी भजन स्पर्धांचे आयोजन झाले. ही आनंदाची बाब आहे. आम्ही सुद्धा नेहमी लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतो या गावाला आपण नेहमी मदत केली आहे. पुढे सुध्दा मी कळमना गावाला विकास करण्यासाठी मदत करत राहिल अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीधरराव मालेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की कळमना येथे कार्यक्रम पाहून खरोखर मला आनंद झाला.


 ग्रामीण भागातील सरपंच सुध्दा पंचायत राज व्यवस्थेचा गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कळमना येथील आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम तर घेतलाच त्याच बरोबर कळमना गाव सुध्दा सुदर केले. त्यामुळे त्यांना मनःपुर्वक शुभेच्छा देतो तुम्हाला विकासासाठी कोणी थांबऊ शकणार नाही तो तुम्ही आणखी आणखी उत्तम कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. या 

         

प्रसंगी प्रमुख पाहुणे उपसरपंच कौशल्या मनोहर कावळे, ग्राम पंचायत सदस्य दिपकदादा झाडे, साईनाथ पिंपळशेंडे, सुनिता उमाटे, रंजना दिवाकर पिंगे, प्रियंका मनोज गेडाम, प्रभाकर साळवे अध्यक्ष हनुमान मंदिर, बाळकृष्ण पिंगे पोलीस पाटील, निलेश वाढई तंटामुक्ती अध्यक्ष, भाऊजी पा वाढई माजी पोलीस पाटील, माजी सरपंच बापुजी पा वाढई, महादेव ताजणे माजी उपसरपंच कळमना, माजी ग्राम पंचायत सदस्य मंगेश ताजणे, बंडु पाटील विरुटकर उपाध्यक्ष सेवा सहकारी संस्था चिंचोली


 खु,सामाजिक कार्यकर्ते मारोती साळवे, मारोती मुसळे, मारोती बल्की, सुरेश गौरकार, अनिल बोढाले, अमोल निमकर, सुरेश कावळे, अरुण आस्वले, दिनेश वांढरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक सेवा निवृत्त कर्मचारी, विविध सामाजिक योगदान देणाऱ्या कार्यकर्ते यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


 या कार्यक्रमाला समस्त गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, कळमना येथील सर्व बचत गटाच्या महिला मंडळ व समस्त गावकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच नंदकिशोर वाढई यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण पिंगे पोलीस पाटील यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !