रांगोळी,रांगोळीने राम लल्ला ची प्रतिमा काढून प्रतिष्ठापनेला केले समर्थन.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : दिनांक,22 जानेवारी 2024 (अमरदीप लोखंडे, सहसंपादक) अयोध्येच्या राम मंदिरातील गाभाऱ्यात रामललाच्याआगमनाच्या प्रति ष्ठापनेला केंद्र सरकार, राज्य सरकारच्या निमंत्रणाला अ-हेर नवरगाव तथा नांदगाव, पिंपळगाव,भालेश्वर,या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील काही जनतेने आदराने स्वीकार करून गावातील देव देवळांची झाडलोट करून धुवून पुसून स्वच्छता केली.
ग्रामवासी,महिलांनी घरासमोर,अंगणात,मुख्य रस्त्यावर सडा टाकून,पाणी शिंपडून रस्त्याची साफसफाई केली आणि मनमोहक अशा रांगोळ्या टाकून रस्त्याच्या दुतर्फा सजविल्या.काही महिलांनी आपल्या घराच्या दारासमोर राम सीतेचे हुबेहूब चित्र रांगोळीने रेखाटुन रामाप्रती असलेली भक्ती दाखविण्याचा प्रयत्न केला.
राम लक्ष्मण सीतेचे हुबेहूब पात्र सजवून ढोल,ताशा, डीजेच्या तालावर गावात मिरवणूक काढण्यात आल्यामुळे रामधुनीचा आवाजाने,देवळा वरती रात्रीपासून वाजणाऱ्या राम लल्ला च्या जीवनावर आधारित भक्ती गीता मुळे सगळे गाव भक्ती रसात तल्लीन होऊन जय श्रीराम जय श्रीराम म्हणू लागले.