गडचिरोली येथे रिपाईची बैठक संपन्न.
एस.के.24 तास - गडचिरोली
गडचिरोली : रिपाईची बैठक विश्रामगृह गडचिरोली येथे रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात मार्गदर्शन करतांना प्रा. मुनिश्चर बोरकर म्हणाले की , रिपाई हि संध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत जरी असली तरी भाजपा , राष्ट्रवादी काँग्रेस. इतर आठ पक्ष महाविकास आघाडीत असुन आम्हचा पक्ष या सर्वासोबत असला तरी आमचे नेते प्रां. जोंगेद्र कवाडे सरानी फक्त राजकीय मार्ग बदलला आहे.
तत्व नव्हे. आम्ही आमचे तत्व बदलवू शकत नाही. तत्वानुसार आम्ही इतर पक्षासी संबध ठेवू.जो आमच्या पक्षाला सहकार्य करील त्याच पक्षाला आम्ही सहकार्य करू अन्यता आम्ही आमच्या मार्गानुसार वागु. आम्हाला विचारात न घेता आमचा उपयोग केवळ मतदानासाठी कुणी घेत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही असे रोखठोक विचार प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी कार्यकर्त्या समोर व्यक्त केले.
याप्रसंगी पक्षाचे कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर,जिल्हा उपाध्यक्ष,मारोती भैसारे यांनीही आपले विचार व्यक्त केले.संचलन रोशन उके यांनी केले.सदर बैठकीला सुरेश मेश्राम,तालुकाध्यक्ष जिवन मेश्राम,नाजुक भैसारे,अनमोल डोंगरे,चरण बारसागडे,बोरकर भाऊ,जैराम उंदिरवाडे,भैसारे,देवेंद्र बोदेले.पाझारे,भाष्कर रामटेके,मोरेश्चर निमगडे,धनपाल दुधे,मिलिंद मेश्राम, दिलीप वालदे,आदि उपस्थित होते.