मराठा व खुला प्रवर्ग सर्वेक्षणावर विमाशि व व्हिजुक्टाचा जिल्ह्यात बहिष्कार.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
चंदपूर : महाराष्ट्र शासनाने राज्यभर मराठा व खुला प्रवर्ग सर्वेक्षण मोही दि.२३ जाने.ते ३१ जाने. करण्याचे आदेश काढले असून याकामी खाजगी शाळांचे व कनिष्ट महाविद्यालयातील शिक्षकांना लावण्याचे निदैश दिले आहेत.या शिक्षकांना पर्यवेक्षक व प्रगणक म्हणून प्रशिक्षण दि.२१ जाने.
पासून सुरु करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धडकताच माध्यमिक शाळा शिक्षकांच्या सर्वात मोठी संघठना असलेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने व विदर्भ कनिष्ट महाविद्यालयातील शिक्षक संघटनेने अगदी परिक्षांचे तोंडावर करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकत असल्याचे लिखीत पत्र चंदपूर जिल्हाधिकारी यांना दिले असून कुणीही शिक्षकांनी या प्रशिक्षणात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे.
या सर्वेक्षणात खाजगी शाळांचे शिक्षक गुंतल्या शाळा ओस होणार आहेत. सध्या अनेक शाळा व कनिष्ट महा.मध्ये वार्षिक सराव परिक्षा सुरू असून पुढिल महिण्याचे २ तारखेपासून बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होत आहेत.
अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे शिक्षकांचा कल असताना या अशैक्षणिक कामात गुंतवून विद्यार्थ्यावर अन्याय करणे योग्य नसल्याचे स्पष्ट करून दोन्ही संगठणांनी या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकांनी प्रशिक्षणात सहभागी होऊ नये असे आव्हान शिक्षक आमदार,सुधाकरराव अडबाले यांनी सुद्धा केले.असून जिल्हाधिकारी यांना तसे पत्र दिले आहे.