पोलीस स्थापना सप्ताह निमित्याने विकास विद्यालय,अहेरनवरगाव येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित.
अमरदीप लोखंडे सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,०५/०१/२४ विकास विद्यालय, अ-हेरनवरगाव येथे पोलीस स्थापना सप्ताह १ जानेवारी ते १० जानेवारी २०२४ निमित्ताने जनजागृती व शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमास महिला पोलीस उपनिरीक्षक संघमित्रा बांबोळे मॅडम, पोलीस उपनिरीक्षक श्री. निशांत जुनोनकर , बिट जमादार श्री. अरुण पिसे, संस्था सचिव मा. श्री. सतिश ठेंगरे,मुख्याध्यापक श्री.एम.बी.धोटे सर,शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
संघमित्रा बांबोळे मॅडम यांनी पोस्को कायदा अंतर्गत विद्यार्थांना मार्गदर्शन केले. श्री. निशांत जुनोनकर यांनी सायबर क्राईम विषयी मार्गदर्शन केले तर श्री. अरुण पिसे यांनी रस्ते अपघात वाहतूकीचे नियम या विषयी मार्गदर्शन केले.संस्था सचिव मा.सतिश ठेंगरे यांनी पोलीस विभागास जेव्हा आवश्यकता भासते त्या प्रसंगाच्या वेळेस सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.