आंतजातीय विवाह सोहळा पोर्ला संपन्न.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक २७/१/२०२४ रोज शनिवारला वर थामदेव लंकेश तिवाडे पोर्ला आणि वधू - साधना मोहन नैताम चंदनखेडी आष्टी यांचे विवाह हिंदू समाजाच्या रीतीरिवाजानुसार मौजा पोर्ला येथील पोटेश्वर देवस्थान येथे थाटामाटात पार पडला.
या प्रसंगी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रविद्र सेलोटे,पोलीस पाटिल हितेद्र बारसागडे सामाजीक कार्यकर्ते निलकंठ संदोकर ' ग्रा.पं.सरपंच निवृत्ता राऊत,ईश्वर तिवाडे, भाष्कर मेश्राम ' ग्रा.पं.सदस्य पोर्ला तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक
समाजसेवक, नवयुवक मंडळी आणि वर-वधू यांचे नातेवाईकांच्या उपस्थितीत वर-वधूच्या व नातेवाईकांच्या संगनमताने आंतरजातीय विवाह सोहळा उत्कृष्टपणे पार पडला त्याबद्दल सर्वांनचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व नववधू वरांना शुभ आर्शीवाद देण्यात आला.