राष्ट्रीय युवा महोत्सवाकरिता गडचिरोली जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांची निवड.
■ युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तथा नेहरू युवा केंद्र द्वारा आयोजित.
एस.के.24 तास
गडचिरोली : नेहरू युवा केंद्र संघटनेच्या वतीने 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे 12 ते 16 जानेवारीपर्यंत नाशिक येथे आयोजन केले असून,पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. यात अरबाज शेख (राष्ट्रीय सेवा योजनेत उत्कृष्ट कार्य), रोशन कोहळे(सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य), _सुरज चौधरी( शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य),भारती आत्राम (माविम उत्कृष्ट स्वयंसेविका),चांदणी बावणे (माविम उत्कृष्ट स्वयंसेविका),जानवी पेद्दीवार (सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी)
या कार्यक्रमात देशभरातून 8000 विद्यार्थी सहभागी होणार आहे. नेहरू युवा केंद्र भारतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरतपणे कार्य करत आहे. युवा दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात संपूर्ण देशभरातून विविध क्षेत्रातील कलागुणांनी संपन्न असणारे विद्यार्थी सहभागी होत असतात. या कार्यक्रमाचे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे नेहरू युवा केंद्र गडचिरोली यांच्या हस्ते निवड करण्यात आली.