राष्ट्रीय समाज पक्षाच्या नागभीड तालुकाध्यक्ष पदी दिपक भंडारवार ची निवड.
एस.के.24 तास
नागभीड : राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभा निवडणूक स्वबळावर निवडणूक लढविणार असून यासाठी वनबुथ वनयुथची निवड करणे सुरू आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री आमदार महादेवराव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. काशिनाथ (नाना) शेवते, प्रदेश मुख्य महासचिव मा. ज्ञानेश्वर (माऊली) सलगर, विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा.अँड,रमेश पिसे,विदर्भ उपाध्यक्ष डॉ. तौसीफ शेख आणि विदर्भ मुख्य महासचिव संजय कन्नावार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहचवण्याचे कार्य सुरू आहे.
पक्षाची ध्येय,धोरणे,विचारधारा सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करणेसाठी नागभिड तालुकाध्यक्ष पदावर दिपक सुरेश भंडारवार यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव विदर्भ प्रदेश,संजय कन्नावार यांनी केली आहे.
त्याच्या निवडीने नागभीड तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.