ताडोबात दोन वाघांचा मृत्यू; वनविभागात खळबळ ; झुंजीत या वाघांचा मृत्यू झाला असावा,अशी शक्यता.
एस.के.24 तास
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र झरी येथील कक्ष क्र. ३३८ मध्ये खातोडा तलाव परिसरात दोन वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली.अधिवास क्षेत्रासाठी झालेल्या झुंजीत या वाघांचा मृत्यू झाला असावा,असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
दोन्ही वाघांचे अवयव पूर्णपणे शाबूत आहेत.२० ते २१ जानेवारी दरम्यान झालेल्या झुंजीत या वाघांचा मृत्यू झाला असावा,अशी शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. वाघाचे शवविच्छेदन केल्यानंतर दहन करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण कळावे,यासाठी विसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.यावेळी कोअरचे उपसंचालक नंदकिशोर काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव),रुदंन कातकर व बंडू धोतरे, एनटीसीएचे प्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी खोब्रागडे उपस्थित होते.