सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपवनक्षेत्रात बिबट्यास जेरबंद


सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपवनक्षेत्रात बिबट्यास जेरबंद 


एस.के.24 तास


सावली : सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपवनक्षेत्रात धुमाकूळ घालून पाळीव प्राण्यांची शिकार करणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. रविवारी सायंकाळी ७ वा.च्या सुमारास बिबट्याला पिजऱ्यांत जेरबंद करण्यात आले आहे.


पाथरी बिटातील मेहा,चिखली या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली होती. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने परिसरात पिजरे लावले होते. रविवारी सायंकाळी ७ वा.च्या सुमारास पिजऱ्यांत अलगद अडकला.


बिबट जेरबंद झाल्याची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती. विशेष म्हणजे,जेरबंद करण्यात आलेला बिबट दुसऱ्या एका बिबट्यासोबत जोडीने या परिसरात वास्तव्यास आहे. एकच बिबट जेरबंद झाल्याने दुसरा बिबट जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !