अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,०४/०१/२४ " सावित्रीबाई फुलेंच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख फार मोठा आहे.१८४८ त्यांनी भिडेवाडयात भारतातील पहिली मुलींची शाळा काढली.महात्मा जोतिराव फुलेंच्या खांद्यावर खांदा लावून स्त्रीयांना सन्मान मिळवून दिला.त्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. प्रस्थापित समाजकंटकांना धडा शिकवून सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची क्रांतीज्योत पेटविली " असे बहूमोल विचार उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी व्यक्त केले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बोलत होते.कार्यक्रम प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे च्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली.याप्रसंगी डॉ.रेखा मेश्राम,डॉ राजेंद्र डांगे, डॉ असलम शेख,डॉ तात्याजी गेडाम,डॉ.धनराज खानोरकर,डॉ.रतन मेश्राम,डॉ युवराज मेश्राम, डॉ योगेश ठावरी, डॉ किशोर नाकतोडे, डॉ.अरविंद मुंगोले,डॉ वर्षा कानफाडे,प्रा जयेश हजारे,पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर,डॉ.दुपारे,डॉ मोहूर्ले,जयंत महाजन,रोशन डांगे, शशिकांत माडे इ.मान्यवरांनी पुष्पगुच्छ वाहून सावित्रीबाईला अभिवादन केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ,युवराज मेश्रामांनी तर डॉ,खानोरकर,प्रा धिरज आतला,जगदिश गुरनुलेंनी मोलाचे सहकार्य केले.