विस्तार अधिकारी ए.सी.बी.च्या जाळ्यात.

विस्तार अधिकारी ए.सी.बी.च्या जाळ्यात.


एस.के.24 तास


साकोली : डांबरीकरणाच्या कामामध्ये मंजूर दरापेक्षा अधिकची प्रदान केलेली शासकीय निधी ग्रामसेवक कडून वसूल करण्याचा आक्षेप अहवाल थांबवण्यासाठी दहा हजारांची लाच घेणाऱ्या साकोली पंचायत समिती येथील ग्राम विस्तार अधिकाऱ्यास लाच घेताना सापळा रचून लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तक्रारदार ग्रामसेवकाकडून लाच घेणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव खिलेन्द्र टेंभरे वय,५३ आहे.अचानक झालेल्या या कारवाईमुळे पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली.


प्राप्त माहितीनुसार यातील तक्रारदार हे लोकसेवक असून ते किन्ही (मोखे) ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना २०१८-१९  मध्ये रस्ता डांबरीकरणाचे कामासाठी १५० टिन डांबर हे ३०००/- रु प्रति टिन या दराने निविदा मागवून ग्रामपंचायतद्वारे खरेदी करण्यात आले होते. २०२३ मध्ये किन्ही ग्रामपंचायतीचे ऑडिट झाले. सदर ऑडिट रिपोर्ट मध्ये तक्रारदार ग्रामसेवक यांनी १००० रुपये प्रति टिन डांबर प्रमाणे खरेदी न करता ३००० रुपये प्रति टिन या दराने डांबर खरेदी केल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला होता. 


पंचायत समिती साकोली येथील आरोपी ग्राम विस्तार अधिकारी टेंभरे याने तक्रारदार यांना रस्ता डांबरीकरणाचे कामामध्ये मंजूर दरापेक्षा ३ लखांपेक्षा जास्त निधी प्रदान केले असल्याने त्याची वसूली तुमच्या कडून केली जाणार असे सांगून सदरची वसुली होऊ द्यायची नसेल तर ज़िल्हा परिषदेस सदर ३ लाख रुपये वसुली बाबतचा अहवाल न पाठवता.


आक्षेपचा निपटारा करून तसा अहवाल पाठवायचा असल्यास त्या मोबदल्यात १० हजार रुपये लाचेची मागणी टेंभरे यांच्याकडे केली होती.सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात सापळा पथकात पोलीस अधीक्षक डॉ.अरुणकुमार लोहार,पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !