मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमात दिरंगाई आणि टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत. ■ घुग्घूस येथील २६ मतदान केंद्रस्तरीय महिला अधिकाऱ्यांवर (बीएलओ) तलाठ्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल.


मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमात दिरंगाई आणि टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत.


■ घुग्घूस येथील २६ मतदान केंद्रस्तरीय महिला अधिकाऱ्यांवर (बीएलओ) तलाठ्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल.


एस.के.24 तास


चंद्रपूर : मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमात दिरंगाई आणि टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत घुग्घूस येथील २६ मतदान केंद्रस्तरीय महिला अधिकाऱ्यांवर (बीएलओ) तलाठ्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.या कारवाईनंतर प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


 १ जानेवारी २०२४ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मतदार पडताळणी करणे, स्थानांतरित, मय्यत, दुबार मतदारांचे नाव वगळणे, भौगोलिक समान नोंदी पडताळणे आदी कामांसाठी शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व अन्य कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)म्हणून निवड करण्यात आली आहे.


पंरतु बीएलओ म्हणून निवड केलेल्या अधिकारी महिलांकडून कामात हयगय केल्या जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे २६ बीएलओना नोटीस बजावून खुलासा मागण्यात आला होता. परंतु, त्यांनी कोणताही खुलासा विभागाकडे सादर केला नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम.यांनी तहसीलदार यांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. तहसीलदारांनी घुग्घुस येथील तलाठी मनोज कांबळे यांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आदेश दिल्यानंतर ३० डिसेंबर रोजी कांबळे यांनी घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दिली.या तक्रारीवरून तब्बल २६ बीएलओंवर भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० चे कलम ३२ आणि भादंवि १८६० चे कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 


गुन्हा दाखल झालेल्या बीएलओंमध्ये मंगला कोयाळकर घुगूस सुनंदा भोंगळे घुग्घूस, रिता स्वामिदास तांड्रा घुग्धूस,पूनम राजेश वानखेडे घुग्धूस, मंजूषा रेखचंद ठाकरे घुग्घूस, मंजुषा मत्ते,नयना अमित चिकाटे,संघमित्रा पथाडे, विद्या पाऊलबुद्धे,राधा कलवल,प्रेमिला कांबळे,लीना पुनगंटी,उर्मिला नगराळे, पूजा गावंडे,अर्चना संजय श्रीवास्कर, वंदना डांगे, योगीता मारोती टोंगे, सुनिता संतोष पाटील, वनमाला सिद्धार्थ वरघट, किरण विलास जुनघरे, उषा धर्मेद्र पाझारे, अल्का रामचंद्र टोंगे,अनुसया चिडे, आशा उरकुंडे,अर्चना बेहरे यांचा समावेश आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !