संघटनात्मक बांधणीतून समाजाची प्रगती निश्चित. - विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार ★ ब्रह्मपुरी येथे कुणबी समाजाच्या उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन.

संघटनात्मक बांधणीतून समाजाची प्रगती निश्चित. - विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार


★ ब्रह्मपुरी येथे कुणबी समाजाच्या उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,२९/०१/२४ महाराष्ट्राच्या भूमीला अनेक बहुजन संतांचा वारसा लाभला आहे. समाजाच्या प्रगतीसाठी जुन्या चालीरीती, परंपरा, रुढी व अंधश्रद्धेला बाजूला सारून समाजाने एकसंघ होऊन संघटित झाल्यास समाजाचा विकास नक्कीच शक्य आहे. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.ते ब्रह्मपुरी येथे अखिल कुणबी समाज मंडळ द्वारा आयोजित उपवधू-वर परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थी तथा मान्यवरांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते.

आयोजित कार्यक्रमास प्रामुख्याने उद्घाटक म्हणून खासदार सुनिल मेंढे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार सुभाष धोटे होते. सत्कारमूर्ती म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार,आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया हे होते.


प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार परिणय फुके, माजी आमदार सेवक वाघाये, जि.प. माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, सकाळचे पत्रकार प्रमोद काकडे, जिल्हा पणन अधिकारी विष्णू तिवाडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दामोधरजी मिसार, शिवतीर्थचे संचालक डॉ. अभिविलास नखाते, गडचिरोली काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, अस्थिरोगतज्ञ डॉ.सतीश दोनाडकर, माजी प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.


पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, धर्मांधतेमुळेच समाजाच्या उन्नतीसाठी अंधश्रद्धेवर प्रहार करणाऱ्यांचा खून करण्यात आला. संत तुकोबारायांच्या विचाराने कुणबी समाज हा सर्व क्षेत्रात प्रगतशील समाज म्हणून उभा झाला पाहिजे.


समाजातील गरीब-श्रीमंत यामधील दरी मिटवून सामूहिक सोहळ्यातून समाजाला आर्थिकरित्या प्रगतशील बनविणे हे प्रत्येक समाज बांधवांची जबाबदारी आहे. समाजातील होतकरू हुशार अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहून समाजातील गुणवंतांना पुढील दिशा दाखवावी. कुणबी समाजाने ब्रह्मपुरी येथे जागा खरेदी करून या जागेवर सभागृह उभारणार आहेत. हे सभागृह विचारांची आदान प्रदान करणारे प्रेरणास्थान म्हणून उदयास यावे अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


सध्या ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. मी मंत्री असताना विशेष शिष्यवृत्ती योजना लागू करून ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर केले. ब्रह्मपुरी तालुक्यातील कुणबी समाज मंडळाने जो पुढाकार घेतला आहे त्यासाठी निधी कमी न पडू देता सदैव कुणबी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित त्यांना दिली. 


यावेळी कार्यक्रमाला ब्रह्मपुरी तालुक्यातील कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ज्योती दूफारे यांनी प्रास्ताविक गोविंदराव भेंडारकर यांनी तर आभार मोंटु पिलारे व पाहुण्यांच्या परिचय माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी करून दिला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !