चंद्रपूर जिल्ह्यातील धनगर समाज घरकुलांपासून वंचित - जिल्ह्यातील दोन्ही दिग्गज नेते लक्ष देतील का ? समाजाचा प्रश्न.

चंद्रपूर जिल्ह्यातील धनगर समाज घरकुलांपासून वंचित - जिल्ह्यातील दोन्ही दिग्गज नेते लक्ष देतील का ? समाजाचा प्रश्न.


एस.के.24 तास


चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत हजारो घरकुल मंजूर झाले असतांना धनगर समाज वंचित असल्याने माजी पालकमंत्री व विद्यमान पालकमंत्री लक्ष देतील का ? असा प्रश्न करीत घरकुल देण्याची मागणी होत आहे.

   

अहिल्याबाई होळकर घरकुल योजना ही भटक्या जमाती क धनगर प्रवर्गासाठी आहे. मात्र जिल्ह्यात अजूनही या योजनेची आंमलाबजावणी करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपापल्या विधानसभा क्षेत्रात भरपूर घरकुले मंजूर केली. परंतु त्यांच्याच क्षेत्रात धनगर समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात असतांना यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल योजनेतून लाभ मंजूर करण्यात आले नाही.


परंतु धनगर समाजासाठी अहिल्याबाई होळकर घरकुल योजना असतांनाही जिल्ह्यात अजुनपर्यंत ही योजना मंजूर करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही दिग्गज नेत्यांवर समाज नाराज असल्याचे दिसते.दोन्ही नेत्यांकडे त्या क्षेत्रातील समाजाचे कार्यकर्ते घरकुलाची मागणी करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !