" हनीट्रॅप " मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी.
★ नागपुरातील पोलीस शिपाई आणि एका पत्रकार सह पाच जणांना गडचिरोली गुन्हे शाखेने ताब्यात.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोलीतील एका सहायक अभियंत्याला ‘कॉलगर्ल’च्या माध्यमातून " हनीट्रॅप " मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी नागपुरातील पोलीस शिपाई आणि एका पत्रकारासह पाच जणांना गडचिरोली गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचा समवेश असून रविकांत कांबळे, सुशील गवई,रोहित अहिर अशी त्यांची नावे आहेत.
४ डिसेंबर रोजी गडचिरोली त कार्यरत सहायक अभियंता नागपुरातील एका हॉटेलमध्ये आरोपी " कॉलगर्ल " सोबत गेला होता.दोघांमधील झालेल्या संवाद दरम्यान त्या महिलेला फिर्यादी अभियंता असल्याचे कळले.तिने सदर बाब नागपुरातील एका डिजिटल माध्यमामध्ये कार्यरत पत्रकार,रविकांत कांबळे याला सांगितली.रविकांत आणि " ती " ची जुनी ओळख होती.
त्या अभियंत्यांची आणि पोलीस शिपाई सुशील गवई ची ओळख असल्याचे रविकांतला माहिती होते.त्यामुळे त्याने " कॉलगर्ल " आणि इतर आरोपींना हाताशी धरून अभियंत्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत गवईकडे १० लाखांची मागणी केली.
गवईने देखील संधी साधून पीडित अभियंत्याला प्रकरण दडपण्यासाठी १० लाख मागितले.मागील महिना भरापासून आरोपींनी अभियंत्याकडे पैश्यांसाठी तगादा लावला होता. यामुळे त्रस्त अभियंत्याने रविवारी गडचिरोली पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
त्यावरून गडचिरोली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी नागपूर येथे सापळा रचून चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यातील एक महिला फरार आहे. आरोपींना गडचिरोलीत आणल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक,अरुण फेंगडे यांनी दिली.