प्रगती अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुल यांच्याद्वारे विधीवत पुजा व भक्तिमय संगीत लावून महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात.

प्रगती अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुल यांच्याद्वारे विधीवत पुजा व भक्तिमय संगीत लावून महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : अयोध्दा येथील श्री. राममंदीर मधील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा निमीत्य प्रगती अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुल यांच्याद्वारे विधीवत पुजा व भक्तिमय संगीत लावून महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली.या वेळी प्रगती अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चे अध्यक्ष कु.कविताताई झोडे व उपाध्यक्ष श्री. प्रवीणराव सुरंमवार  यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. व  प्रगती अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संदीप बद्देलवार तसेच इतर संचालक व कर्मचारी उपस्थित होते. 




असंख्य महिला – पुरुष  व सोबतच बालगोपालांनी  श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा च्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने व सहखुशीने उपस्थिती दाखवली आणि या कार्यक्रमाला पार पाडण्यास सहकार्य केले.अयोध्या धाममध्ये श्री राम लल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण प्रत्येकालाच भावनिक करणारा आहे. या दिव्य कार्यक्रमाचा भाग होणं सर्वासाठी भाग्याचा क्षण आहे, ५०० वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर अयोध्दा येथे श्री. राममुर्तीची प्राणप्रतिष्ठा देशाचे लोकप्रीय प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.


रामलल्ला च्या प्राण प्रतिष्ठा मुळे श्रीराम जन्मभूमी आयोध्यासह संपुर्ण भारतात भक्तीमय वातावरण झालेलें आहे.या संगीतामध्ये जेव्हा राम भक्त महाप्रसादाचा लाभ घेत होते. तेव्हा सर्व रामभक्त आणि येथील नागरिक भक्तिमय आणि अलौकिक मन प्रसन्न आणि आनंदी होते. या ऐतिहासिक भावनिक क्षणाचे साक्षीदार होणे मोठे सौभाग्य असल्याचे यावेळी प्रगती अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुल अध्यक्ष कु.कविताताई झोडे यांनी म्हटले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !