ती कारवाई प्रशासकीय दडपणातून.? - रुपेश मारकवार यांचा आरोप.


ती कारवाई प्रशासकीय दडपणातून.? - रुपेश मारकवार यांचा आरोप.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : जुनासुर्ला येथील तलाठी एकनाथ गडेकर यांनी जुनासुर्ला चे साईनाथ बुग्गावार यांचेे विरूध्द केलेली तक्रार निराधार आणि व्यक्तीगत वैमनस्यातून  असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता,रुपेश मारकवार यानी निवेदनातून केला आहे. 


तलाठी गडेकर यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत राजगड वासीय गावकरी जाणुन आहेत. मुळात तलाठी गडेकर हे हेकेखोेर प्रवृत्तीचे,भ्रष्ट प्रवृत्तीचे असुन ते राजगड साजाला असतांना येथील लोकांना नाहक त्रास देण्याचेच काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. प्रत्येक कामात अडवणुक करून पैसे मागण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे गावकरी त्यांना नेहमीच शिव्याशाप देत असतात.


 जुनासुर्ला येथील प्रकरणात नक्की काय घडले याबद्दल अनभिज्ज्ञता आहे मात्र तलाठी गडेकर यांनी दाखल केलल्या तक्रारीतील आरोपात तथ्थ  नसून        गडेकर यांचा स्वभाव स्वतःला मोठे म्हणुन घेण्याच्या असल्याने आपल्या बचावात ते कुणाचाही नाहक बळी देत असल्याचेही मारकवार यांचा आरोप आहे.


 स्वतःला वरीष्ट अधिका-याची उपमा देऊन माझे कुणीच काही वाकडे करू शकत नाही अशा वर्ग ना ते करीत असतात असे मारकवार  यांनी स्पष्ट केले आहे. जुनासुर्ला प्रकरणाशी आपला सरळ  संबध नाही मात्र शासनाच्या कायदयाचा चुकीच्या पध्दतीने वापर करून निर्दोष लोकांना नाहक त्रास दिला जात असून साईनाथ बुग्गावार यांचे विरूध्द लावलेले सर्व आरोप खोटे व बिनबुडाचे असल्याने याप्रकरणाची सखोल चौकशी करून तलाठी गडेकर यांचे विरूध्द प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी रूपेश मारकवार यांनी केली आहे. 


या प्रकरणाबाबत जिल्हयाचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेषी भ्रमनध्वनीव्दारे बोलणे झाले असुन साईनाथ बुग्गावार यांचे विरूध्द पोलीसांनी लावलेल्या कलमाच्या बाबत माहिती घेऊन त्या मागे घेण्याची मागणीतून त्यांनी पुढे  केली आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !