धर्माच्या नावाने भावना भडकाऊन मत घेणाऱ्यांपासून सावध रहा - डॉ.नामदेव किरसान.
एस.के.24 तास
गडचिरोली : मौजा विसापूर ता.गडचिरोली जि. गडचिरोली येथे एकता नाट्य कला मंडळ विसापूर यांच्या वतीने "माऊली" या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसान यांनी आपल्या उदघाटणीय भाषणात राम मंदिराचा विषय काढत सांगितले की, या महिन्यात अयोध्येत नवनिर्मित राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे.
यानिमित्त भारतीय जनता पार्टीने व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घरोघरी अक्षता व प्रसाद पोहोचविण्याचे ठरविलेले आहे जेणेकरून रामाच्या व धर्माच्या नावावर हिंदूंची गठ्ठा मतं मिळविता येतील. परंतु जनतेने सावध राहण्याची गरज आहे. रामाच्या व धर्माच्या नावावर मतं मागणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेशजी टिकले,शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीशभाऊ विधाते,विजयजी पाटील, मुख्याध्यापक बनसोड सर, जितेंद्रजी मोहुर्ले,श्रीमती रत्नमालाबाई मोडक, महादेव पाटील भोयर, दूधबावरेजी, बावणेजी, नगरसेवक संजयजी मेश्राम, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेषक उपस्थित होते.