तेजस्वीता आणि आक्रमकता हा नेताजीचा बाणा : प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : दिनांक, २५ /०१/२४ (अमरदीप लोखंडे, सहसंपादक) ब्रिटीश सरकारला पळविण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोसांनी अनेक पातळ्यांवर कार्य केले.' तुम मुझे खून दो/ मैं तुम्हे आजादी दूॅंगा ' ही आक्रमकता त्यांनी दाखवून ' आजाद हिंद सेने'ची फौज उभी केली.हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरेही आपल्या आक्रमण शैलीमुळे जनमाणसात प्रसिद्ध होते.तेजस्वीता व आक्रमकता हा नेताजीचा बाणा होता " असे विचार प्राचार्य डॉ डी एच गहाणेंनी व्यक्त केले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेला माल्यार्पण करुन प्राचार्य व प्रा विनोद नरड यांनी केली.यानंतर उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, राजेंद्र डांगे,डॉ रेखा मेश्राम, डॉ तात्याजी गेडाम, डॉ असलम शेख,डॉ धनराज खानोरकर, डॉ भास्कर लेनगुरे,डॉ किशोर नाकतोडे,डॉ मोहन कापगते,डॉ अरविंद मुंगोले, डॉ हर्षा कानफाडे,डॉ पद्माकर वानखडे, डॉ सुनिल चौधरी, डॉ पद्माकर वानखडे,डॉ अतुल येरपुडे,प्रा आनंद भोयर,डॉ मोहूर्ले,प्रा खोब्रागडे, अधीक्षक,संगीता ठाकरे,रोशन डांगे,जयंत महाजन,रुपेश चामलाटे,घनश्याम नागपूरे इत्यादींनी पुष्पगुच्छ वाहून अभिवादन केले.
यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ कुलजित शर्मा,डॉ युवराज मेश्राम,डॉ खानोरकर,प्रा धिरज आतला,प्रदीप रामटेकेंनी मोलाचे सहकार्य केले.