मिलिंद खोब्रागडे यांना अष्टपैलू काव्यलेखन पुरस्कार.

मिलिंद खोब्रागडे यांना अष्टपैलू काव्यलेखन पुरस्कार. 


एस.के.24 तास -  गडचिरोली. 


गडचिरोली : संस्कृती कला अकादमी मुंबई संस्थेच्या वतीने एक दिवसीय वार्षिक पुरस्कार सोहळा देवाची आळंदी जिल्हा पुणे येथे नुकताच पार पडला. संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या अक्षरमंच राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेच्या संस्थेत सलग सहभागी होऊन सर्वोत्कृष्ट,उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल मान. मिलींद बी खोब्रागडे, रा.गडचिरोली ह्यांना "अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्कार" देऊन सन्मानीत करण्यात आले.


             अनेक पुरस्काराचे मानकरी मान. मिलिंद बी.खोब्रागडे हे एक सामाजिक जाणिवेचे कवी, लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. कविता, लेख, कथा तसेच अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तेजनार्थ, भावस्पर्शी क्रमांकाने गौरविण्यात आलेले आहे. दिनांक २४ डिसेंबर २०२३ ला राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मान.मिलींद बी.खोब्रागडे रा.गडचिरोली ह्यांना अष्टपैलू  काव्यलेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

         

 संस्थेचे संस्थापक मा. शिवाजी खैरे सर व अनुसया खैरे मॅडम उपस्थितीत "देवाची आळंदी" जिल्हा पुणे ह्या संतांच्या भूमीत हा सोहळा दिनांक २४/१२/२०२३ रोजी संपन्न झाला. जागतिक किर्तीचे जेष्ठ साहित्यिक मा.डॉ. मधुसूधन घाणेकर यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदरणीय श्री. शिवाजी किसन खैरे सर, मा.सौ.अनुसयाताई खैरे मॅडम मा.श्री अनंत बोरकर, मा.सौ.अलकाताई झरेकर, मा.श्री. विनोद गोल्हार या मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा उत्साहात पार पडला.


 सर्व मान्यवर व अक्षरमंचचे सर्व कार्यकारी समिती तसेच अनेक राज्यभरातून आलेले सारस्वत, ज्येष्ठ साहित्यिक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी मिलिंद बी.खोब्रागडे यांना यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !