अ-हेरनवरगाव बीट केंद्रात नवरत्न स्पर्धा तथा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ पार पडला.

अ-हेरनवरगाव बीट केंद्रात नवरत्न स्पर्धा तथा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ पार पडला.


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : दिनांक,२५/०१/२४(अमरदीप लोखंडे - सहसंपादक) ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,बीट केंद्र अ-हेरनवरगाव येथे नवरत्न स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत आठ शाळेच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी सहभागी स्पर्धेत आपापले कौशल्य पणाला लावून उस्फुर्त सादरीकरण केले.


नवरत्न स्पर्धेत विजेत्या शाळेतील स्पर्धकांना संगरक्षक डांगे सर वाळके सर अमरदीप लोखंडे व केंद्रातील शिक्षकांच्या हस्ते बक्षीस देण्यात येऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला व  त्यांना तालुकास्तरीय तथा जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी यश संपादन करण्यास शुभेच्छा दिल्या.नवरत्न स्पर्धा आटोपल्यानंतर लगेचच याच केंद्रातील सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.


यात सत्कारमूर्ती संगरक्षक डांगे, तिलक तिघरे, समर्थ सर यांचा सपत्नीक अ-हेरनवरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख ओमप्रकाश बावनकुळे,उच्च श्रेणी मुख्याध्यापिका  नांदगाव जाणि चंदाताई रामटेके,सेवानिवृत्त शिक्षक वाळके सर यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी अ-हेरनवरगाव केंद्रातील शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थीनीं उपस्थित होते.


सत्कार समारंभ नंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनींना देण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री,देवानंद तुरकाने सर यांनी उत्कृष्ट बहारदार शैलीत केले तर आभार कुमारी प्रियंका निकुरे मॅडम यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !