रनमोचन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शहीद बालक स्मृतिदिन.
★ " त्या " चार बालकांना वाहिली श्रद्धांजली.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : दिनांक,२३/०१/२४ (अमरदीप लोखंडे - सहसंपादक) २२ जानेवारी १९९९ रोजी बरडकिन्ही येथून शालेय बाल क्रीडा स्पर्धेतून विजयश्री प्राप्त करून रनमोचन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे विद्यार्थी ट्रॅक्टरने गावाकडे परत येत असतांना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ब्रह्मपुरी आरमोरी रोडवरील रुई (विद्यानगर) जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनीडोरने शालेय विद्यार्थी बसून असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने रनमोचन येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा अपघात घडला होता.
त्यात बरेच विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते.तर
१) प्यारेलाल पंढरी शंभरकर,
२) प्रदीप वामन ठाकरे,
३) शांताराम नवलाजी राऊत
४) प्रकाश शंकर ठाकरे, या चार बालकांचा घटनास्थळी अपघाती मृत्यू झाला होता.
सदर घटनेचे पडसाद ब्रह्मपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उमटले होते.एकाच दिवशी या चारही बालकावर वैनगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावावर संपूर्ण शोककळा पसरली होती.
जिल्हा प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी खासदार, आमदारासह राजकीय पुढाऱ्यांनी गावाला भेट देऊन मृतक व जखमी कुटुंबियांचे सांत्वन देखील केले होते.तेव्हा पासून २२ जानेवारी हा दिवस ब्रह्मपुरी पंचायत समितील गांगलवाडी बीट तसेच बेटाळा केंद्रां अंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्व शाळेत स्मृती दिवस म्हणून पाळला जातो.
२२जानेवारी २०२४ ला रणमोचन उच्च प्राथमिक शाळेत बालक स्मृतिदिन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी " त्या " चारही बालकांच्या "शहीद बालक स्मृतीस्तंभाचे तसेच विद्यार्थ्यांच्या प्रतिमेला त्यांच्या आई वडील व पालकांनी व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश पिलारे,सरपंच,नीलिमा राऊत, पोलीस पाटील अस्मिता पिलारे,उपसरपंच सदाशिव ठाकरे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष,दादाजी पिलारे, ग्रामपंचायत सदस्य संजय प्रधान,कोमल मेश्राम मंदा साहारे,पत्रकार विनोद दोनाडकर,शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष अनु अलमस्त,सदस्य रेशम शंभरकर, नवलाजी राऊत,वामन ठाकरे,रतन शेभरकर, सुधीर राऊत, कार्तिकशाम राऊत,केशव राऊत,अंगणवाडी कार्यकर्त्या लक्ष्मी दोनाडकर,शाळेचे मुख्याध्यापक,संजय झुरमुरे,सहाय्यक शिक्षक कृष्णा किरमिरे,अमोल सडमाके, काशिनाथ हेडाऊ,नरेंद्र आंबोरकर,प्रीती बांलपाडे तथा समस्त ग्रामवासीयांची उपस्थिती होती.