ब्रम्हपूरीतील शेकडो युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

ब्रम्हपूरीतील शेकडो युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रह्मपुरी : दिनांक,२१/०१/२४ सध्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, बेरोजगारी व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या असून सर्वसामान्य जनता, गृहिणी,शेतकरी, शेतमजूर, उच्चशिक्षित तरुण वर्ग यांना जीवन जगणे अवघड झाले आहे. यामुळे युवकांचा कल मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाकडे वाढलेला दिसून येत आहे.


ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकासकामांवर व खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवत ब्रम्हपूरी येथील शिवछत्रपती फाऊंडेशनचे अध्यक्ष मोंटु पिलारे यांच्यासह ब्रम्हपूरी शहरातील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात,काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते,विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसच्या दिग्गज पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


यावेळी जगदीश उर्फ मोंटु पिलारे,रवी पवार,अतुल राऊत, सचिन कऱ्हाडे,प्रविण नंदनवार, आशिष मुळे, शुभम कावळे,सुरेश नरड, तारकेश्वर राऊत,विनीत मेश्राम, संदीप सोंदरकर, प्रणय बेदरे,अभय भागडकर,राजेश तलमले, निखील करंबे,अक्षय जांभुळे,श्रेयस कावळे,अविनाश भुर्रे,आशिष वंजारी,विनोद कराणकर,अक्षय कुथे,अमित सहारे, भुपेंद्र बेदरे, अनिकेत कान्हेकर, राकेश शेंडे यांसह शेकडो युवकांनी यावेळी पक्षप्रवेश केला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !