विद्यार्थांना शालेय साहित्य वाटून ८१ वा वाढदिवस साजरा ; केशवराव लाटेलवार यांचे ८२ वर्षात पदार्पण.
एस.के.24 तास
सावली : मानवी जिवन अनेक संकटाने व्यापले असताना, 'शंभर धागे दुखःचे एक धागा सुखाचा 'या म्हणीनुसार एक सुखाचा,आनंदाचा क्षण आपल्या परिवार आपेष्टांच्या उपस्थितीत समाजाला काही देणे लागते या उद्देशाने मुलांनी आपल्या वडीलांचा वाढदिवस साजरा केला, या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप केले, वडील केशव व्यंकुजी लाटेलवार यांच्या ८१ व्या वाढदिवस सावली येथे साजरा करण्यात आला.
आपल्या मुलाचा आणि स्वताचा वाढदिवस साजरे करणारे या जगात अनेक लोक आहेत परंतु आपल्या म्हाताऱ्या वडिलाचा वाढदिवस साजरे फार दुर्मिळ आहेत असा उल्लेख प्रविण दुर्गे यांनी केला. गेल्यावर्षी सुध्दा मोठया थाटात वाढदिवस साजरा करून अपंग, विधवा निराधारांना ब्लँकेट चे वाटप करून ८० वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रविण दुर्गे,शुभांगी दुर्गे,नारायण सेमस्कर,अमित डोंगरे,रीतिक शेंडे, वैभव म्हशाखेत्री, मंदाताई लाटेलवार,रुपचंद लाटेलवार,मानसी लाटेलवार,सोनी नरूले, कोकराज शिंदे,लाटेलवार परिवाराचे बरेचशे नातेवाईक आणि लाटेलवार परिवार या मंगलक्षणी उपस्थित होता.