अखेर अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मंजुर होणार.५२ दिवसाचा संप मागे.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक एस.के.24 तास
गडचिरोली : अंगणवाडी सेविकांचा ५२ दिवस सुरु असलेला संप व त्यांच्या मागण्या अखेर शासनाने मान्य केला असुन अंगणवाडी सेविकाने आपला संप अखेर मागे घेतला. यापूढे अंगणवाडी सेविकांना पेन्शन व ग्रज्युटी मिळणार असुन मुंबईत पार पडलेल्या बैठकीत अंगणवाडी व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी सदर घोषणा केली.व कृती समितीने अखेर अंगणवाडी सेविकांचा संप मागे घेतला.कृती समितीचे पदाधिकारी अप्पा पाटिल,दत्ता देशमुख,माधुरी शिवणकर,सुर्वणा तळेकर,निशा शिवरकर आदिची उपस्थिती होती.
अंतिम प्रस्ताव शासनाकडे अंमलबजावणी साठी पाठविण्याचे अप्पा पाटिल यांनी सांगितले. मिनि अंगणवाडीचे मोठ्या अंगणवाडीत रुपांतर केल्या जाईल असा लेखी अंगणवाडी कृती समितीला देण्यात आला असुन आता अंगणवाडी सेविकांचा संप मागे घेण्यात येईल असेही कृती समितीने सांगीतले.
गडचिरोली सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी सतत संपात सहभागी होवून संप यशस्वी केला होता. यात आयटकचे देवराव चवडे व डॉ.महेश कोपूलवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.