सावली तालुक्यातील अपंग बांधवाना तीनचाकी सायकलचे वाटप.
★ विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातून अपंग बांधवाना मदतीचा हात.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,०२ जानेवारी २०२४ राज्याचे विरोधी पक्षनेते तथा सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून व विशेष प्रयत्नातून जनसंपर्क कार्यालय सावली येथे सावली तालुक्यातील अपंग बांधवाना तीनचाकी सायकलचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांनी मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे आभार मानीत जनसेवेचे व्रत धारण केलेले आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक आहेत आपल्या विजयकिरण फाउंडेशन च्या माध्यमातून ते निराधार शोषित,पीडित व आजारी व्यक्तीच्या मदतीला नेहमीच धावून येतात, लोकसेवत त्यांनी स्वतःला अर्पण केले आहे, त्यांचा आदर्श आज प्रत्येक नेत्यांनी घ्यावा,व जनसेवा करावी असे त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार, नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मा.किशोर कारडे,महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी, न.प.बांधकाम सभापती सौ.साधना वाढई,महिला व बाल कल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे
उसेगावचे उपसरपंच मा.सुनील पाल,नगरसेवक मा.प्रफुल वाळके,मा.प्रीतम गेडाम,मा.नितेश रस्से,मा.सचिन संगीडवार,,नगरसेविका सौ.अंजली देवगडे,सौ.ज्योती गेडाम,सौ.प्रियंका रामटेके, सौ.पल्लवी ताटकोंडावार,सौ.सीमा संतोषवार,माजी ग्रा.प.सदस्या सौ.कविता मुत्यालवार,मा.किशोर घोटेकार,मा.मिथुन बाबनवाडे,मा.पंकज कागदेलवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,सौ.शिला गुरनुले,मा.बादल गेडाम,आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक बहुसंख्यने उपस्थित होते.