यशवंतराव चव्हाण घरकुलसाठी अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल - गटविकास अधिकारी यांचे आश्वासन.
एस.के.24 तास
सावली : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत भटक्या जमातींना घरकुल मंजूर करण्यात आले. मात्र अधिवास प्रमाणपत्राची ( डोमेशियल) अट असल्याने अनेकांचे जन्मप्रमाणपत्र नसल्याने अधिवास मिळत नव्हते त्यामुळे लाभापासून वंचित राहण्याची पाळी येत होती.
अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याची मागणी प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विजय कोरेवार यांचे नेतृत्वात गटविकास अधिकारी सावली यांना निवेदन देत चर्चा केली.
याबाबत गटविकास अधिकारी यांनी विषयाची गंभीरता लक्षात घेऊन अट शिथिल करीत तहसीलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्राच्या आधारे लाभ देण्याचे संबंधित विभागास कळविले.
यावेळी विमुक्त जाती भटक्या जमाती सावली तालुकाध्यक्ष हरिदास मेश्राम,कढोलीचे सरपंच,किशोर कारडे,उपसरपंच ,नितीन कारडे,राजू कंचावार,योगनाथ भोयर,रवींद्र गेडाम,केशव गोहणे,पितांबर वासेकर, श्रीकांत बहिरवार,गणपत गेडाम.मोरेश्वर गेडाम,अंबादास गडगीळवार,शिवराम गोहणे आदी उपस्थित होते.