सूर्याचे मकर वृत्तात जाणे आणि मकर संक्रांतीला नदीवर भक्तांचे स्नान करणे.

सूर्याचे मकर वृत्तात जाणे आणि मकर संक्रांतीला नदीवर भक्तांचे स्नान करणे.


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : दिनांक,१५/०१/२४ (अमरदीप लोखंडे - सहसंपादक) तिळाची माया गुळाची गोडी तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत प्राचीन परंपरेला अनुसरून भाविक भक्त संक्रांतीच्या दिवशी नदीवरती स्नान करण्यासाठी बैल बंडी,ट्रॅक्टर,मोटारसायकल,चार चाकी वाहने,पायदळ जाऊन आपल्या घरच्या देवी-देवतांच्या मूर्तीची शुद्ध पाण्याने विधिवत पूजा अर्चा करून नदीपात्रात स्नान करून आपल्या शरीराला,मनाला शुद्ध करताना दिसले.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो रात्र लहान होत जाते आणि दिवस तिळा तिळाने वाढत जातो..या प्राचीन संस्कृतीला जपत ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा भालेश्वर या नदीकिनारी छोट्याशा खेडेगावा लगत असलेल्या वैनगंगा नदी वरती आज सकाळपासून भाविक भक्तांची गर्दी, रांग लागलेली आहे .

 

बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून भालेश्वर वाशीय जनतेने नदीकिनारी असलेल्या देवस्थानावरती बाहेरून येणाऱ्या भावीक भक्तांच्या विश्रांतीसाठी पाल पेंडाची व्यवस्था केली असून मनोरंजना करिता जागरणाचा संगीतमय कार्यक्रम सकाळी अकरा वाजेपासून ठेवलेला आहे.कोणताही भाविक भक्त उपाशी जाऊ नये त्यासाठी त्यांनी महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे.


सकाळी होऊ घातलेल्या जागरण या शिव भक्ती मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक सतीश भाऊ वारजूरकर यांच्या हस्ते श्री नेताजी मेश्राम माजी पंचायत समिती सभापती ब्रह्मपुरी ग्रामपंचायत भालेश्वर चे सरपंच संदेश रामटेके, ग्रामपंचायत सचिव रतिराम चौधरी,ग्रामपंचायत सदस्य, भालेश्वर देवस्थान मंडळाचे पदाधिकारीया, वामन भाऊ मिसार , इतर प्रतिष्ठित मान्यवर मंडळी ,यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.आज मकर संक्रांतीच्या दिवशी भालेश्वर घाटाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !