दूषित झालेल्या राजकारणाला शुद्ध करण्याकरिता गांधी विचारांची प्रासंगिकता. - डॉ.नामदेव किरसान
★ जिल्हा काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन.
एस.के.24 तास
गडचिरोली : वर्तमानात भारतीय राजकाणर दूषित होत चालले आहे. लोकशाही राज्यात सुडबुधीचे राजकारण केल्या जात आहे. सरकार विरोधात बोलल्यास किंवा सत्याची बाजू घेतल्यास त्यांच्यावर खोटे आरोप लावून सत्ताधाऱ्याकडून दडपशाही केल्या जात आहे.
अश्या दूषित राजकारनाला शुद्ध करण्याकरिता गांधींनी सांगितलेला सत्य आणि अहिंसेच्या मार्ग आणि विचारांची आज गरज आहे असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ.नामदेव किरसान यांनी व्यक्त केले.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी शहर अध्यक्ष सतीश विधाते,अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष, संजय चंने,परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, तालुकाध्यक्ष,वसंत राऊत, माजी जि.प.सदस्य कुसुमताई आलाम
दिलीप घोडाम,सुनील चडगुलवार,देवाजी सोनटक्के, हरबाजी मोरे,काशिनाथ भडके,संजय मेश्राम,शिवराम कुमरे,राकेश रत्नावार,राजेंद्र कुकडकर,भैय्याजी मुद्दमवार,अपर्णाताई खेवले, आशाताई मेश्राम, रजनी आत्राम क्रिष्णा वाढई,रोहित चंदावार,अनिल गुरनुले,माजिद सय्यद,प्रफुल आंबोरकर,जावेद खान,सोहेल खान,पुंजीराम वाघरे,अशोक बघेले,रवी क्षीरसागर सह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.