कळमना येथे ग्राम सम्मेलन तथा भव्य खजेरी भजन स्पर्धांचे आयोजन. ■ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५५ व्या पुण्यस्मरणाचे निमित्त.

कळमना येथे ग्राम सम्मेलन तथा भव्य खजेरी भजन स्पर्धांचे आयोजन. 


राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५५ व्या पुण्यस्मरणाचे निमित्त. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त ग्राम सम्मेलन तथा भव्य खजेरी भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 

         

या प्रसंगी पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार सुभाष धोटे, राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, प्रमुख मार्गदर्शक आदर्श सरपंच भास्कर पा.पेरे, आदर्श सरपंच चंदु पा. मारकवार,आमदार सुधाकर अडबाले,आमदार अभिजित वंजारी, आमदार प्रतिभा ताई धानोरकर, माजी आमदार वामनराव चटप,सुदर्शन निमकर,संजय धोटे, देवराव भोंगळे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर,जेष्ठ नेते दादा पाटील लांडे,अरुण निमजे माजी सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर राजेंद्र कराळे सर राज्य सल्लागार तथा अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद चंद्रपूर,देवा भाऊ पाचभाई विदर्भ अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य,प्रमुख पाहुणे


नंदकिशोर वाढई उपक्रमशील स्मार्ट सरपंच कळमना तथा विदर्भ सरचिटणीस अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य कौशल्य मनोहर कावळे उपसरपच कळमना, ग्राम पंचायत सदस्य दिपक झाडे,साईनाथ पिंपळशेळे सुनिता  उमाटे, रंजना दिवाकर पिंगे प्रियंका मनोज गेडाम पोलिस पाटील बाळकृष्ण पिंगे तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई उपस्थित राहणार आहेत.  

          

यावेळी तज्ञ मान्यवरांकडून पंचायतराज व्यवस्थेबद्दल सुंदर मार्गदर्शन लाभणार आहे. एकच ध्यास गावाचा विकास हेच ध्येय मनाशी घेऊन उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई हे गावांसाठी काम करत आहे म्हणून त्यांनी सर्व गावकरी मंडळीना घेऊन सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हि विनंती आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !