निंबाळा येथे हनुमान मुर्ती अभिषेक व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह संपन्न.

निंबाळा येथे हनुमान मुर्ती अभिषेक व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह संपन्न. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा निंबाळा येथे बाजीराव महाराज यांच्या कृपेने हनुमान मुर्ती अभिषेक व भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक तहसीलदार गौड,अध्यक्ष कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच,ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा.सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई हे होते. 

        


या प्रसंगी उद्घाटक म्हणून गौड साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भुमीत अनेक संत महात्मे होऊन गेले आजही त्यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक तत्वज्ञानावर आपण चालत आहे हिच खरी प्रेरणा आहे. तर सरपंच नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की मानवी जीवनात आध्यात्मिक विचार आणि आचरणाला फार महत्त्व आहे. आचरण जर चांगले असेल तर तुमच्या किर्तीचा सुगंध सर्वत्र पसरतो हि एक ईश्वरीय देणगी आहे. जो या मध्ये रमला, रुजला, लिन झाला तर त्याचे जिवन निश्चितच सुखमय व आनंदी होईल. 

      

यावेळी विशेष मार्गदर्शक ह भ प ईश्वर महाराज वाजंरीकर, ह  भ प रामदास महाराज भोयर तोहगाव, ह भ प सुधाकरराव महाराज वनसडीकर, प्रमुख पाहुणे सुनील उरकुडे जि. प. चे माजी सभापती, दिपकदादा चटप परदेशी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी तथा कायदा अभ्यासक, ग्राम पंचायत सदस्य दिपकदादा झाडे, साईनाथ पिंपळशेंडे, प्रियंका मनोज गेडाम, नरेंद्र काकडे माजी प. स. सदस्य, शंकर आत्राम सरपंच कुकुडसाथ, गोपाल पाल पोलिस पाटील निंबाळा, महादेव ताजणे माजी उपसरपंच, जेष्ठ नागरिक सुधाकर पिंपळशेंडे, महादेव मेश्राम, विठ्ठल पाटील पाल


विठ्ठल पाटील वाढई, मुख्यध्यापक दौलत भोंगळे, सामाजिक कार्यकर्ता नामदेव देवाळकर, प्रभाकर पाल, सिताराम सिडाम, निलकंठ मोडघरे, भास्करराव पिंपळकर,विजय गेडाम, साईनाथ शेरकी, खेमदेव देवाळकर, छबन एकरे, शंकर कोंगरे, हनुमान मंदिर मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पेदोंर, उपाध्यक्ष भिवसन मोडघरे, सचिव विलास तेलंग,कार्यक्रमाचे संचालन गोवारदिपे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोपाल पाल पोलिस पाटील यांनी केले या कार्यक्रमाला,शिवभक्त मंडळाचे कार्यकर्ते,समस्त गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !