युवकांनी खेळामध्ये ही शिखर गाठावे : प्रा.अतुल देशकर
★ नमो चषक 2024 क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२७/०१/२४ ब्रम्हपुरी तालुक्यातील जवराबोडी मेंढा येथे भारतीय जनता युवा मोर्चा व इलेव्हन क्रिकेट क्लब जबरा बोडी मेंढ्याच्या वतीने नमो चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या 75 व्या गणराज्य दिनाचे औचित्य साधून नमो चषक या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार,
भाजप नेते प्रा.अतुल देशकर यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ.वंदना शेंडे,भाजपा तालुका अध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रा. रामलाल दोनाडकर, माजी जि.प सदस्य काशिनाथ पाटील थेरकर, बाजार समितीचे संचालक प्रा.यशवंत आंबोरकर, जवराबोडी मेंढाचे सरपंच देवराव उईके प्रामुख्याने उपस्थित होते.
युवकांनी शिक्षणासोबतच खेळामध्ये ही शिखर गाठवे अस आवाहन माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी युवकांना या प्रसंगी केले. सोबतच युवकांनी व्यसनापासून दूर राहून व्यक्तिमत्त्व विकसित करावे असे सांगितले व भविष्यात अशाच प्रकारच्या भव्य स्पर्धांचे आयोजन करू असे सांगत युवकांचा उत्साह वाढविला.
भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदनाताई शेंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांसाठी केलेल्या अनेक जनहितकारी धोरणांची व योजनांची माहिती देत युवकांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी बाजार समितीचे संचालक यशवंत आंबोरकर व जोराबोडी मेंढाचे सरपंच श्री. देवराव उईके यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव तथा नमो विधानसभा संयोजक तनय देशकर, सरपंच श्री उईके, भाजपा मेंडकी अध्यक्ष राजू आंबोरकर, युवा मोर्चा तालुका महामंत्री अविनाश मस्के, साकेत भानरकर, मेंडकी ग्राम. पं सदस्य राजेंद्र आंबोरकर, भाजपा सोशल मीडिया तालुका संयोजक धीरज पाल, शामराव राणे, दुर्वास निकुरे, विलास उईके, विनायक थेरकर, मुखरूजी घरत,
चरण पा थेरकर,विलास उईके, विनायक थेरकर, पुंडलिक थेरकर, प्रकाश गोबाडे, मधुकर थेरकर, सुधाकर मडावी, तामदेव थेरकर, घनश्याम थेरकर उपस्थित होते. इलेव्हन क्रिकेट क्लबचे रोशन बोरकर, शेखर बोरकर, स्वप्नील बोरकर, मारोती थेरकर, छत्रपाल श्रीरामे, सूरज बावणे, साईनाथ थेरकर, आदिनाथ थेरकर, रोशन राणे, रोहित थेरकर, अविनाश शेंडे, विशाल थेरकर व येथील युवक या ठिकाणी उपस्थित होते.