राज्य पत्रकार संघाचे "Mirror Man" मान. डॉ.विश्वासराव आरोटे ★ राज्य पत्रकार संघाचे दोन सेनानी सर्वश्रुत आहेत. एक " सर्वमान्य नेतृत्व


राज्य पत्रकार संघाचे "Mirror Man" मान. डॉ.विश्वासराव आरोटे


★ राज्य पत्रकार संघाचे दोन सेनानी सर्वश्रुत आहेत. एक " सर्वमान्य नेतृत्व "


एस.के.24 तास


चंद्रपूर :  मा.वसंत मुंडे व दुसरे " मिरर मॅन" ठरलेले संघाचे राज्य सरचिटणीस मा.डॉ.विश्वासराव आरोटे. संघाचा प्रत्येक घटक, पदाधिकारी,संघटनेच्या सुरेल संचालना संबंधाने या दोन्ही प्रतिभावंताकडे एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून बघत असतो.


जमिनीवर पाय टेकणारा, संघटनेच्या सर्वात शेवटच्या घटकाशी नाळ जुळलेला संघटनेचा बोलका चेहरा, " मिरर मॅन " म्हणजे आमचे राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस मा. विश्वासराव आरोटे, महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर गोवा, कर्नाटक, गुजरात ते दिल्ली पर्यंत राज्य पत्रकार संघाचे साम्राज्य पसरविण्यात मा. आरोटे साहेबांचे योगदान अगदी स्पष्ट आहे. प्रदेशाध्यक्षांचे सोबतीने काम करणारा हा जिद्दी, चंचल, मेहनती म्होरक्या संघटनेची ओळख बनून गडचिरोली ते गोवा पर्यंतच्या सदस्यांचे हृदयात वसला आहे.


संघात खालून वरपर्यंत संवाद साधताना मा. आरोटे साहेबांचे कार्य, तळमळ अगदी निखळपणे पत्रकारांच्या हितासाठीच असल्याचे स्पष्टपणे जाणवते. आरोटे व राज्य पत्रकार संघ असे एक समिकरण तयार झाले म्हटल्यास नवल नसावे. संघटनेच्या प्रत्येक घटकांबाबत असलेली आंतरिक तळमळ मा. आरोटे साहेबांच्या अविरत धावपळीतून लक्षात येते. 


संघटनेतील प्रत्येक घटकाने, सदस्याने ही तळमळ सांभाळून, जोपासून पुढाकार घेतला तर खंच्या अर्थाने मान, आरोटे साहेबांच्या कार्याचा गौरव होणार आहे. मान, संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनात पत्रकार संघ सांभाळण्याची सक्षमता च सहजता लाभलेल्या पहिल्या फळीतील दोन मुत्सद्द्यांना मी अनुभवले आहे. मान. वसंत मुंडे व मान. विश्वासराव आरोटे. संघटन साफल्यासाठी धावपळ व संघटन कौशल्य यातून अलंकारीत झालेले " मिरर मॅन "म्हणजे आमचे राज्य सरचिटणीस मा. विश्वासराव आरोटे. सर्वसामान्य सदस्य व पत्रकारांना मा. आरोटे साहेबांची संयमी, प्रामाणिक धडपड आदर्शवत ठरावी अशीच आहे. 


पत्रकार संघाचे खऱ्या अर्थाने नेतृत्व करणाऱ्यांना सतत काटेरी मुकुट शिरावर घेऊन मागेपुढे चालावे लागते. प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते कारण पत्रकारांचे पत्रकारितेती घटकांचे प्रश्न सोडविताना पुढे पुन्हा अनेक प्रश्न उभे ठाकतात व प्रश्नांची उकल करून शासन दरबारी उत्तरे सुद्धा आपणच सादर करावी लागतात. या विचिन्न चक्रव्युहातून स्वतः सोबत संपूर्ण संघाला सावरून सन्मानित करण्याचे श्रेय मा. आरोटे साहेबांना सुद्धा जाते व यामुळेच ते राज्य पत्रकार संघाचे " Mirror man" ठरले आहेत.


राज्य पत्रकार संघात Quantity & Quality यांची सांगड घालण्यात जे मोठे यश पदाधिकाऱ्यांना मिळाले आहे. यात प्रदेशाध्यक्ष मान, बसंत मुंडे यांच्यासह मा. विश्वासराव आरोटे यांचाही मोठा वाटा आहे. पत्रकार सृष्टीच्या समस्या शासनस्तरावर सतत भांडून सोडवाव्या लागतात. एकीकडे शासन दरबारी भांडताना दुसरीकडे सामाजिक सहकार्य संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रमातून पदरी पाडून घेण्याचे कौशल्य शिकविण्याचे महतकार्य मान. आरोटे साहेब यांनी केले आहे.


 राज्य पत्रकार संघ ३६५ दिवस वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून आपली सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. मान, आरोटे साहेबांची कल्पकता, मेहनत, क्षमता किंबहुना एकत्रित व्यक्तिमत्व व संघातील हजारो पदाधिकारी व सदस्यांना लाभणारे त्यांचे मार्गदर्शन हे आमचे सोभाग्य, त्यांच्या कधनी व करणीतून संघटनेतील प्रत्येक घटकाला ऊर्जा मिळत आहे.


" मिरर मॅन " ठरलेल्या मान, आरोटे साहेबांचे योगदान संघासाठीच नाही, तर राज्यभरातील पत्रकारांसाठी मोठे आहे.राज्य पत्रकार संघाच्या व्यासपीठावरून समाजातील इतर घटकांकरीता जनसेवेचे व्रत जोपासण्याची शिकवण आरोटे यांच्या कर्तृत्वातून आम्हाला मिळत आहे. संघमीवृत्ती, चंचलता, सेवाभाव व जलदगती कार्य या गुणविशेषाने मा. विश्वासराव आरोटे " मिरर मॅच " या उपाधीवर तंतोतंत उतरतात.


अल्पवयात आगळीवेगळी पत्रकारीता,संघटनकला, दांडगा संपर्क साधणारा हा सेवाभावी पत्रकार म्हणजे राज्य पत्रकार संघाची शान ठरावा.


 - लेखन प्रा.महेश पानसे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पूर्व विदर्भ अध्यक्ष

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !