डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल कम्युनिटी लर्निग सेंन्टर वायगाव येथे जागतिक A I D S दिवश साजरा.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल कम्युनिटी लर्निग सेंन्टर वायगाव येथे जागतिक A I D S दिवश साजरा.


एस.के.24 तास


गडचिरोली : मॅजिक बस इंडिया फाऊडेशन तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल कम्युनिटी लर्निग सेंन्टर वायगाव येथे जागतिक A I D S दिवश साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्रभारी मुख्याध्यापक वाढई हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन बन्सोड सर,गजभिये सर , कार्यक्रमाच्या आयोजिका प्रवजा उंदिरवाडे मॅडम आदि लाभले होते.


प्रास्ताविक भाषणात उंदिरवाडे मॅडम म्हणाल्या की सामाजीक संघटना,आरोग्य विभाग,संस्था ,आदिनी एडस निमुर्लन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे.व वेगवेगळे उपक्रम राबविले पाहीजे. मुख्याध्यापक वाढई आपल्या भाषणात म्हणाले की काही वाईट सवयीमुळे गुप्त रोग वाढत आहेत. याला वेळीच आवर घातला तर स्थिती आटोक्यात आल्याशिवाय राहणार नाही यासाठी सामाजीक संघटनांनी पुढाकार घेतला पाहीजे.


कार्यक्रमाचे संचालन,रुची उंदिरवाडे तर आभार आर्यन अलोणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी C L C सेंक्टर चे विध्यार्थी रंजना वनकर,अस्मिता रोहनकर,प्रिती पाल,सिमरन तवाडे,मानवी वनकर,यवानी उराडे,आर्यन पुन्छलवार,प्राशिक उंदिरवाडे,अंश मडावी आदिनी सहकार्य केले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !