चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करताना,उपविभागीय अधिकारी,पर्वणी पाटील उपस्थित सोल्युशन मीडिया चे समन्वयक,सुरेश कन्नमवार
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा. - उपविभागीय अधिकारी, पर्वणी पाटील
★ सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जनजागृती.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गोंदिया : दिनांक,05/12/2023 मंगळवारी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील सर्व गरजू लाभार्थीनी घ्यावा,असे आवाहन उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय,गोंदियाद्वारे मंगळवारी नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.पाटील यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण,कृषि अधिकारी,पवन मेश्राम,जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक,कैलाश गजभिये व धम्मदिप बोरकर सोल्युशन मीडिया चे समन्वयक,सुरेश कन्नमवार उपस्थित होते.
पर्वणी पाटील म्हणाल्या,सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना चित्ररथा च्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू लाभार्थीपर्यंत पोहोचविण्याकरिता जिल्हा माहिती कार्यालयाचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेऊन सदर योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या योजनांचा घ्या लाभ : -
सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी निवासी शाळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सब- लीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत- गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे,मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह इत्यादी योजनांचा यात समावेश आहे.
९५ दिवस जिल्ह्यात जनजागृती : -
जिल्ह्यात आजपासून एकूण ४ चित्ररथ ९५ दिवस फिरणार असून जिल्ह्यातील प्रत्येकी २ तालुक्यातील गावोगावी जाऊन सदर चिररथाद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू लाभार्थीनी सदर योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे करण्यात येत आहे.