अजय कंकडालवार यांचा २४ ला काँग्रेस पक्ष प्रवेश.आलापल्ली येथे भरगच्च कार्यक्रम.

अजय कंकडालवार यांचा २४ ला काँग्रेस पक्ष प्रवेश.आलापल्ली येथे भरगच्च कार्यक्रम. 


एस.के.24 तास - गडचिरोली


गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा आविसचे नेते सेवाभावी,सामाजीक कार्यकर्ते हे दि.२४ डिसेंबर २०२३ ला आलापल्ली येथील भरगच्च कार्यक्रमात आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह कांग्रेस पक्षात पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती नुकत्याच पार पडलेल्या सिरोचा येथील कार्यकर्ता मेळाव्यात केला.


 सिरोचा येथे आविस ची बैठकीत माजी जि.प . अध्यक्ष अजय कंकडालवार म्हणाले की, सामान्य कार्यकर्त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मी लवकरच कांग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे.आपण सर्वानी मला साथ देऊन सहकार्य करावे.असे आवाहन आविस च्या मेळाव्यात केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी हात उंच करून भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत. 


अशी गर्जना कार्यकत्यांनी केली. भारतीय राष्ट्रीय पक्षाचे नेते व विरोधी पक्ष नेते ' विजयभाऊ वड्डेटिवार यांच्या प्रत्यक्ष उपस्थितआलापल्ली येथे दि. २४ डिसेंबर २०२3 रोजी भरगच्य अश्या कार्यक्रमात अजयभाऊ चा कांग्रेस पक्षप्रवेश होणार आहे. सिरोंचा येथील आविस च्या बैठकीत केलेल्या पक्ष प्रवेश निर्णयाच्या वेळीस कार्यकर्त्यांनी दुजोरा दिला. सदर बैठकीला आविस चे जेष्ठ नेते मंदा शंकर , बाजार समितीचे संचालक आकुला मालिकार्जुनराव ' माजी सरपंच ताला वेकण्णा , आसरअली ग्रा.प. चे सरपंच रमेश मेकाला , सिरोचा नगर पंचायत चे उपाध्यक्ष बबलु पाशा,बाजार समितीचे संचालक नागराज इंगीली , अशोक हरी,संतोष पडाला, बामणीचे सरपंच अजय आतला , गर्कपेठचे सरपंच सुरज गावंडे ' किरणकुमार वेमुला , गादे सोमय्या आदि सहीत सिरोंचा तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !