डॉ.बासाहेबांनी दिलेले संविधान जिवंत ठेवण्याची गरज. - गोपाल रायपूरे
मुनींश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली - डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी भारताला सुंदरश संविधान बहाल केल त्यांचे संरक्षण करणे तुम्हा आम्हा सर्वाचे कर्तव्य आहे.संविधान चालविणारे राज्यकर्ते नालायक निघाले तर संविधान बदलवून पुन्हा मनुस्मृती येणार की काय यांची भिती सर्वाना वाटत आहे. पण आपण सज्ज राहले पाहिजे अश्या प्रकारचे मार्गदर्शन गोपाल रायपूरे यांनी केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम विश्रामगृह गडचिरोली येथे पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष, प्रा.मुनिश्वर बोरकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपालजी रायपूरे.
शेड्युल कास्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष,अँड,विनय बांबोळे,माजी जि.प.अध्यक्ष, समय्या पसुला माजी नगरसेवक, गुलाबराव मडावी,सामाजीक कार्यकर्ते रामनाथ खोब्रागडे ' मोहन मोटघरे 'आदिवासी नेत्या वनिता पदा,माजी सरपंच,परसराम बांबोळे,नरेश महाडोरे, पो.पा. पंडित मेश्राम,पिरिपाचे जिल्हा उपाध्यक्ष,मारोती भैसारे एम.डी.चलाख आदि लाभले होते.
याप्रसंगी मोहन मोटघरे म्हणाले की,पिडीत - वंचितांना त्यांचा हक्क,अधिकार मिळण्यासाठी पुन्हा एकदा लढा देण्याची गरज आहे.याप्रंसगी रामनाथ खोब्रागडे म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे कार्य पुढे नेण्याचे कार्य सर्वानी केलं पाहिजे.
याप्रसंगी गुलाबराव मडावी यांनी संविधानाची लढाई पुन्हा लढायची आहे यासाठी एस.टी.एस.सी.नी एकत्र येण्याची गरज आहे.समय्या पसुला यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे संचालन दिलीप गोवर्धन यांनी तर आभार पिरिपाचे तालुकाध्यक्ष रोशन उके यांनी मानले. कार्यक्रमास मिलिंद भानारकर ' अरुण शेन्डे ' पुरुषोतम वाळके ,नाजुक भैसारे , जिवन मेश्राम ' मुक्तेश्चर बारसागडे , निलकंठ सिडाम , शरद लोणारे उपसरपंचअमोल मेश्राम , अमोल डोंगरे , बोरकर , राजेश्वर बुरांडे , चोखाबा ढवळे , जैराम उंदिरवाडे , चंद्रभान अंबादे , चरण बारसागडे , मोरेश्वर निमगडे , पो. पा. हेमंत मेश्राम , लवकुश भैसारे , दिलीप वालदे ' घनश्याम रायपुरे , साहित बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.