सावली पोलिसांनी कोंबड बाजारावर धाड मारून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केले.
★ सहा आरोपीना अटक.
एस.के.24 तास
सावली : सावली पोलीस स्टेशन हद्दीतील सामदा शेतशिवरात कोंबडा झुंज लाऊन जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती सावली पोलिसांना मिळाली असता सापळा रचून धाड टाकली असता कोंबड्यांची झुंज लावताना मुद्देमालासह 6 आरोपींवर कारवाई केली.
सामदा येथील कोंबड बाजारावर 25 डिसेंबर ला सकाळी धाड टाकली असता आरोपींकडून 4 मोटर सायकल सहित अंग झडतीत नगदी तसेच कोंबडे व कात्या मिळून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला गेला.
आरोपी,किशोर शंकर चलाख रा,सोनापुर,बालाजी कृष्णा मेश्राम रा सोनापुर,अशोक गुरुदास गेडाम रा व्याहाड बु,अतुल शामराव शेंडे,महेश मारुती गेडाम रा, व्याहाड बू ,नितेश सदाशिव भुरसे रा सोनापुर यांचेवर जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्री रवींद्र सिंग परदेशी यांचे आदेशान्वये ठाणेदार श्री आशिष बोरकर यांचे मार्गदर्शन खाली पो.उप.नी.एकनाथ राठोड,सहा फौजदार श्री,चरण मडावी,हेड कॉन्स्टेबल संजय शुक्ला,दिलीप मोहुर्ले,कॉन्स्टेबल चंद्रशेखर गंपलवार,धीरज पिदुरकर,अशोक मडावी यांनी केली.