डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे खरे राष्ट्रभक्त होते : महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम. - डॉ.रमेशजी पांडवांचे प्रतिपादन
अमरदीप लोखंडे, सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,०९/१२/२३ " डॉ. बाबासाहेब आंबेडकर वे अर्थशास्त्रीय होते, त्याचप्रमाणे त्यांनी जीवनाच्या सर्वच क्षेत्राचा बारकाईने अभ्यास केला होता. ते कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाऊन त्याचा खोल अभ्यास करत. आपली माणसं सर्वच क्षेत्रात जाऊन विकसीत झाली पाहिजे म्हणून त्यांनी कसोसिने प्रयत्न केला."मी प्रथम भारतीय व अंतिमतः भारतीय आहे " असे ते म्हणत.देशाच्या विकासासाठी त्यांचे योगदान लाखमोलाचे आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे राष्ट्रभक्त होते. " असे मार्मिक विवेचन अखिल भारतीय टोली सदस्य सामाजिक समरसता मंचाचे डॉ. रमेशजी पांडव यांनी केले.
ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनानिमित्त मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी.एच.गहाणे होते तर उपस्थितीत प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रभारी,सामाजिक समरसता मंचाचे निलेशजी गद्रे ,ब्रह्मपुरी शाखेचे भगवान कन्नाके, प्रा.जयंत खरवडे,प्रा.मेजर विनोद नरड उपस्थित होते.
यावेळी निलेशजी गद्रेंनी डॉ बाबासाहेबांची व्यापकता समजावून सांगीतली तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ गहाणेंनी, बाबासाहेबांनी, 'एक व्यक्ती एक मत ' अधिकार मिळवून दिला. 'हिंदू कोड बिला' मधिल कायदे आता शासन अमलात आणत आहे, हे बाबासाहेबांच्या परिश्रमाचे फळ आहे, असे हटले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहूण्यांचा परिचय भगवान कन्नाकेंनी केला.संचालन समिती प्रभारी डॉ.कुलजित शर्मानी तर आभार प्रा.धिरज आतलांनी मानले.
यशस्वीतेसाठी डॉ.धनराज खानोरकर,डॉ.युवराज मेश्राम,ए.एस खोब्रागडे,रुपेश चामलाटेंनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला डॉ.रेखा मेश्राम,डॉ.रतन मेश्राम,डॉ. प्रकाश वट्टी,डॉ.मिलिंद पठाडे,प्रा.आकाश मेश्राम व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.