चरूर गावातील विद्यार्थ्यांनी मॅजिक उपक्रमाला भेट देत मावळत्या वर्षाला दिला निरोप व नवीन वर्षाचे केले स्वागत.
एस.के.24 तास
चिमुर : दि,१ जाने.2024 : भद्रावती तालुक्यातील चरूर या गावातील शालेय विद्यार्थ्यांनी भिशी जवळील पुयारदंड येथील डॉ. रमेशकुमार गजबे शिक्षा संकुल येथे सुरू असलेल्या मॅजिक उपक्रमाला दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी भेट दिली.
यामुळे विद्यार्थ्यांनी एकप्रकारे मावळत्या 2023 या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2024 या वर्षाचे स्वागत करण्यासाठी शैक्षणिकसहलीचे आयोजन करून एक वेगळा पायंडा रोवला आहे,असे मत मॅजिक उपक्रमाचे मुख्य संयोजक वाल्मीक नन्नावरे यांनी व्यक्त केले.
चरूर या गावात नुकताच आदिवासी माना जमात व ग्रामवासी यांच्या वतीने वतीने नागदिवाळी उत्सव साजरा करण्यात आला. यानंतर गावातील शालेय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीचे आयोजन करून भिसी येथे सुरू असलेल्या मॅजिक उपक्रमाला भेट दिली.
त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी रम-रमा-पार्टी यात गुंतलेल्या तरुणाईपुढे या विद्यार्थ्यांनी आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांनी मॅजिक ला भेट दिल्यानंतर त्यांनी मॅजिक उपक्रमाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली मॅजिक उपक्रम कसा चालतो. येथील विद्यार्थी नेमके काय करतात.त्यांची दैनंदिनी कशी असते. मॅजिक परिवाराच्या भविष्यातील नेमक्या कोणत्या योजना आहेत.अशी इत्यंभूत माहिती त्यांनी जाणून घेतली.त्यानंतर मॅजिकचे माजी विद्यार्थी आणि पोलीस विभागात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर जांभुळे यांनी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे उत्तम मार्गदर्शन केले. यानंतर त्यांनी मॅजिकला अन्नधान्य व आर्थिक स्वरूपात भरघोस मदत सुद्धा केली.
याप्रसंगी आदिवासी विद्यार्थी युवा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष नंदकिशोर जांभूळे, ग्रामशाखेचे अमोल दडमल व गावातील नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.