ब्रह्मपुरी म.रा.मराठी पत्रकार संघातर्फे नविन ठाणेदार अनिल जिट्टेवारांचे स्वागत : विभागातील अनेक समस्यांवर चर्चा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,०६/१२/२३ येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे ब्रह्मपुरीच्या पोलिस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले नविन ठाणेदार अनिल जिट्टेवारांचे संघाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष डॉ.धनराज खानोरकर,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ.रवी रणदिवे,सचिव नंदू गुड्डेवार,पत्रकार राहुल मैंद, पत्रकार प्रशांत राऊत,पत्रकार अमरदीप लोखंडे आदी उपस्थित होते.यावेळी ब्रह्मपुरी विभागात दुर्गापूर ठाण्यातून पोलिस निरीक्षकपदी रुजू झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करुन ब्रह्मपुरी विभागातील अवैध रेतीतस्करी, अवैध जुगार,मटका व गावगाडयात अवैध विकल्या जाणारी देशी दारुचे धंदे, सुंगधित तंबाखूचे अड्डे, नियमबाह्य वाहतूक यावर चर्चा करण्यात आली.
या सर्व समस्यांवर आपण योग्य उपाययोजना करण्यात येऊन कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.हे आवाहन पेलण्यासाठी मला अभ्यास करुन प्रत्येक प्रश्न निकाली काढावा लागेल,त्यासाठी आपल्याही सहकार्याची गरज आहे.आपण सारे मिळून या समस्यांवर मात करु या ! असा आशावाद ठाणेदारांनी व्यक्त केला.