सुशिला भगत यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.
एस.के.24 तास - गडचिरोली.
गडचिरोली : अहेरी - नागेपल्ली येथील समाजसेविका तसेच सेवानिवृत सुपरवाईझर सुशिला भगत हिला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नेपाळ देशातील कांठमाडू येथील त्रिभुवन विद्यापिठात पुष्परत्न साहित्य समुह नाशिक,गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ,सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात गडचिरोली जिल्हयातील समाजसेविका सुशिला भगत यांच्या समाजीक कार्याची दखल घेऊन मानवता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार नेपाळचे उपराष्ट्रपती प्रेमानंद झा यांचे हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. सुशिला भगत ह्यांनी आदिवासी बाहुल भागात उत्कृष्ठ समाजसेवा केली त्यामुळे त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे जिल्हयात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.