अवैध रेती तस्करावर मूल महसुल विभागाची धडक कारवाई ; वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले. ★ महसूल विभाग ‘अँक्शन मोड’वर वाहने केली कार्यालयात जमा.

अवैध रेती तस्करावर मूल महसुल विभागाची धडक कारवाई ; वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले.


★ महसूल विभाग ‘अँक्शन मोड’वर वाहने केली कार्यालयात जमा.


एस.के.24 तास


मुल :  तालुक्यातील वाळू घाटातून  चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक होत असल्याने महसूल विभागाने मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. या मोहिमेदरम्यान वाहने ताब्यात घेऊन वाहन चालकांना लाखांचा दंडही ठोठावला.या कारवाईमुळे वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.


तालुक्यात जवळपास वाळू घाट आहेत. यातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूची वाहतूक केली जाते.  शासनाचा महसूल बुडवून सर्वसामान्यांची लूट करीत आहेत. याची माहिती तहसीलदार डॉ.रविंन्द्र होळी यांना मिळताच त्यांनी या वाळू चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याकरिता  महसूल विभागाने वाहने जप्त केली आहेत. या जप्त केलेल्या वाहनांवर नियमानुसार दंड आकारण्यात येऊन कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ.रविन्द्र होळी यांनी दिली.


ही कारवाई उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार डॉ.रविंन्द्र होळी, नायब तहसीलदार राम नैताम,मंडळ अधिकारी व तलाठी,कोतवाल यांच्या पथकाने केली आहे.या गोपनीय कारवाईमुळे रेती माफियांची अक्षरशा दाणादाण उडाली, सदर कारवाईमुळे सर्वत्र तहसिल पथकाचे कौतुक होत आहे.यानंतर देखील अशा गोपनीय कारवाया सुरू राहतील अशी माहिती तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी यांनी दिली आहे.


गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी विशेष पथक निर्माण केले आहे. आतापर्यंत वाहने जप्त करण्यात आली असून लाखांचा दंड आकारण्यात आला. वाळू घाटाची तपासणी सुरु असून अवैध वाळू चोरट्यांवर कारवाई सुरू आहे. -

डॉ.रविंन्द्र होळी,तहसीलदार,मुल

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !