रनमोचन येथे १ जानेवारी पासून ज्ञानदान श्रीमद् हरिनाम भागवत सप्ताहाचे आयोजन. ■ ६ जानेवारीला गोवर्धन पूजेचा वैनगंगा नदीवर विशेष कार्यक्रम.

रनमोचन येथे १ जानेवारी पासून ज्ञानदान श्रीमद्  हरिनाम भागवत सप्ताहाचे आयोजन.


■ ६ जानेवारीला गोवर्धन पूजेचा वैनगंगा नदीवर विशेष कार्यक्रम.


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी. दिनांक,३०/१२/२३ (अमरदीप लोखंडे सहसंपादक) दरवर्षीप्रमाणे यंदाही रणमोचन येथील ग्रामवासी जनतेच्या वतीने नवीन वर्षाच्या प्रारंभी १ जानेवारी ते ७ जानेवारी २०२४ सात दिवस ज्ञानदान श्रीमद हरिनाम भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

भागवत हरिनामाचे वाचन : - 

 ह. भ .प. सुश्री. साध्वी दिलासा मेघश्याम ठलाल मु.कडोली तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली यांच्या अमृततुल्य वाणीतून होणार आहे. या कालावधीत पहाटे ५ वाजता सामुदायिक ध्यान, सकाळी ९ वाजता ग्रामसफाई,९:३० वाजता रामधुन पालखी मिरवणूक, १० वाजता ग्रामगीतेवर प्रवचन, सायंकाळी ५ ते ७ वाजता सामुदायिक  प्रार्थना व हरिपाठ,८ ते ९ भजनाचा कार्यक्रम,९ ते११ वाजेपर्यंत प्रवचनाचा कार्यक्रम रोजप्रमाणेच होईल.


तर ६ जानेवारी रोजी गोवर्धन पूजेचा विशेष! कार्यक्रम वैनगंगा नदीवर घेण्यात येईल. ७ तारखेला सायंकाळी ५ गोपाल काला व प्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. तरी सर्व भाविक भक्तांनी या गोपाल काल्याचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे भागवत सप्ताह आयोजक समितीने कळविले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !