नरेंद्र मोदींच्या " विकसित भारत " या राष्ट्र उभारणी कार्यांत सर्वांचा सहभाग महत्त्वाचा.
★ प्रा.अतुलभाऊ देशकर, माजी आमदार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपूरी : दिनांक,१०/१२/२३ भारताला विकसनशील राष्ट्रांच्या यादीतून बाहेर काढून विकसित राष्ट्रांच्या यादीत नेऊन बसविणे,हे ग्लोबल लीडर अप्रुव्हल रेटिंग मध्ये जगातील नंबर एकचे नेते,विश्वगुरू,भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे.यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचतील हे सुनिश्चित करून सरकारच्या योजनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात आयोजित केली जात आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात देखील पंचायत समिती ब्रह्मपुरी तर्फे दिनांक 23/ 11/ 2023 ते दिनांक 29/ 12 /2023 पर्यंत "विकसित भारत संकल्प" यात्रेचा नियोजन आराखडा तयार केला असून शासनाकडील "डिजिटल स्क्रीन" असलेली सुसज्ज व्हॅनद्वारे, संवर्ग विकास अधिकारी श्री.संजय पुरी यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समिती अंतर्गत सर्व ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात या संकल्प यात्रेचे आयोजन केले जात आहे. अशी माहिती पंचायत समितीचे सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी मा.रवींद्र घुबडे यांनी दिली.
नियोजित वेळापत्रकानुसार दि. 9 डिसेंबर रोजी "मांगली" या गावी या संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले. या संकल्प यात्रेला ब्रह्मपुरी विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय प्रा.अतुलभाऊ देशकर हे अध्यक्षस्थानी होते.तर पंचायत समिती ब्रह्मपुरीचे संवर्ग विकास अधिकारी श्री.संजय पुरी, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी रवींद्र घुबडे,माजी सभापती प्रा.रामलाल महादेव दोनाडकर, माजी उपसभापती डॉ.गोकुल बालपांडे,भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष प्रा.डाॅ.अशोक सालोटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद मोटघरे हे या संकल्प यात्रेला प्रमुख अतिथी उपस्थित होते. तद्वतच पंचायत समिती ब्रह्मपुरीचे सर्व अधिकारी,शासकीय योजनांचे सर्व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
भारत हा विकसनशील देश असून नरेंद्र मोदींचा भारत विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प आहे.आणि म्हणून भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा.असे आवाहन ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी लोकप्रिय आमदार आदरणीय प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी याक्षणी केले.