तंटामुक्त समिती आष्टा ने लावून दिले प्रेमी युगुलांचा विवाह.
एस.के.24 तास
भद्रावती : भद्रावती तालुक्यातील आष्टा येथील प्रेमी युगालांचे दोन वर्षा पासून एकमेकांशी प्रेम असल्याने विवाह करण्याची कुटुंबाकडे विनंती केली मात्र कुटुंबाकडून विरोध होऊ लागल्याने आष्टा येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समिती कडे अर्ज केला.
त्यांनी मुलगा नामे,आष्टा येथील गजानन भाऊराव कारमेंगे वय,26 वर्ष, व मुलगी नामे,गावातील,किरण राजू गुरुनुले वय,24 वर्ष यांनी तंटामुक्ती समिती कडे लग्न लावून देण्याची विनंती केली.तंटामुक्त समिती च्या पुढाकाराने प्रेमियुगल विवाह बंधनात अडकले.
त्यांचा विवाह आष्टा येथील समिती पदाधिकाऱ्यांनी लावून दिला.त्यावेळी अध्यक्ष,दिवाकर जी शेंडे यांनी दोघांची कागदपत्रे तपासून त्यांचा विवाह माँ माणिका मंदिर येथे पंचासक्षम लावून दिला.यावेळी सरपंच,चांगदेव भाऊ रोडे,सुहास बहिरे पोलीस पाटील,निखिल तिवाडे, किशोर कावडे,हरीश राजु,कारमेगे,संजय ददमल,चेतन कारमेंगे,तसेच गावातील इतर नागरिक उपस्थित होते.