भटके जमातीच्या लोकांना घरे बांधण्यासाठी शासनाने जमीन दयावी. - समय्या पसूला माजी जि.प.अध्यक्ष
एस.के.24 तास
गडचिरोली : भटक्या - विमुक्त जमातीचे अनेक कुटुंब गडचिरोली शहराच्या धानोरा रोड स्नेहनगर व कोटगल रोड येथे गेल्या १५ वर्षापासून तंबु ठोकुन झोपड्यात वास्तव्याला राहत असुन आपले कुटुंब उदरनिर्वाहचे काम करून गरीब भटकी जमात' पावसाळ्यातही आपले कुटुंब चालविता. अश्या भटक्या जमातीच्या लोकांना शासनाने महसुल ची झुडपी जमीन देवुन सहकार्य केल्यास त्या जमीनीवर घरे बांधून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करू शकतील.
अश्यातच त्यांनी धानोरा रोड व कोटगल रोडवर महसूलची जमीन शोधून आपल्या झोपड्या तयार करीत असतांना नगर प्रशासन व वनविभागाच्या कर्मचार्यांनी 'तुम यहाके नही हो ! आप भटकते रहते आप झोपडी बांध नही शकते ऐसा कहकर त्यांच्या झोपड्या उध्वस्त करीत आहेत. हम भारत के नागरिक है! हमारा मुलभुत अधिकार है! ऐसा कहकर भी प्रशासन अश्या लोक्यांच्या झोपड्या उध्वस्त करीत असुन प्रशासक एक प्रकारचा त्यांचेवर अन्याय करीत आहे.
तरी महसुल विभागाने त्यांना जमीन घ्यावी अशी मागणी भाजपाचे नेते समय्या पसुला यांनी खासदार अशोक नेते,सी.सी.एफ. एस रमेशकुमार. नगर प्रशासक याचे कडे केली असुन शासनाने भटक्या जमातीवरील अन्याय दुर करावा अन्यता येथील भटकी जमात उपोषणाचा मार्ग पत्कारल्या शिवाय राहणार नाही.अशी ही मागणी माजी जि.प.अध्यक्ष,समय्या पसुला यांनी केली आहे.