गडचिरोली तालुका विज्युक्टा कार्यकारिणी गठित.
मुनींश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : अध्यक्षपदी प्रा.सुनील कामडी तर सचिव पदी प्रा.सुदर्शन मोहूर्ले.शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे विज्युक्टा गडचिरोली तालुक्याची कार्यकारिणी निवडणूक जिल्हाध्यक्ष प्रा.विजय कुतरमारे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत घेण्यात आली.या सभेला प्रमुख अतिथी म्हणून सहसचिव प्रा.सौ. विजया मने, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. कू.विद्या कुमरे उपस्थित होते.सदर सभेमध्ये तालुका कार्यकारिणीची बिनविरोध व सर्व संमतीने निवड करण्यात आली.
तालुकाध्यक्ष म्हणून प्रा.सुनील कामडी,उपाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर धकाते,सचिव प्रा.सुदर्शन मोहुर्ले,सहसचिव प्रा. कू.विद्या गोंगल,संघटन सचिव प्रा.सचिन दुमाने, कोषाध्यक्ष प्रा.मनोहर वैद्य,प्रसिद्धी प्रमुख प्रा.सौ.सुनीता साळवे तर सदस्य म्हणून प्रा.देवानंद कामडी,प्रा. जालेंद्र सोरते,प्रा.शेखर गडसुलवार,प्रा.रवींद्र मडावी,प्रा.सौ.संध्या येलेकार,प्रा. कू.रुपाली कोसे,प्रा. कू.वैशाली पुणेकर, प्रा.चंद्रभान खोब्रागडे यांची निवड करण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारिणीत तरुण व उत्साही पदाधिकारी असल्यामुळे जिद्दीने काम करून संघटना मजबूत करावी व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी संघटनेने केलेल्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा.विजय कुतरमारे यांनी उपस्थितांना केले.सभेचे संचालन व आभार प्रा.विलास पारखी यांनी मानले. नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.